श्री शिवाजी महाविद्यालयात माजी सैनिकांचा सन्मान

कारगिल दिवस शहीदांना श्रध्दांजली

परभणी (२७) येथील श्री शिवाजी महाविद्यालयात २३ व्या कारगिल दिवस निमित्ताने भारतीय सैन्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत शहरातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
कारगिल दिवसाच्या औचित्याने मंगळवार (दि.२६) रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने कारगिल युद्धात शाहिद झालेल्या हुतात्म्यांना श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते माजी सैनिक कॅप्टन किशन बाळस्कर, सुभेदार मेजर एस. एम. कुबडे, हवलदार रामराव गायकवाड, नाईक नवनाथ डोळे आदी माजी सैनिकांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस कारगिल युद्धात शाहिद जवानांना श्रध्दांजली अर्पित करत दोन मिनिटांचे मौन बाळगून अमर जवान प्रतिकृतीस मान्यवरांनी पुष्पांजली अर्पित केली. शेवटी उपस्थितांनी घोषणा दिल्या.
सदरील कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, राष्ट्रीय छात्रसेना विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ, प्राध्यापक तसेच कॅडेटस उपस्थित होते.

श्री शिवाजी महाविद्यालयात कारगिल दिवसाच्या निमित्ताने शहरातील माजी सैनिकांचा सत्कार प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सैनिक कॅप्टन किशन बाळस्कर, सुभेदार मेजर एस. एम. कुबडे, हवलदार रामराव गायकवाड, नाईक नवनाथ डोळे, डॉ.श्रीनिवास केशट्टी, डॉ.विजया नांदापुरकर, डॉ.रोहिदास नितोंडे, डॉ.प्रशांत सराफ आदी दिसत आहेत.